0
4
8
2
9
0
अशी असावी कविता
अशी असावी कविता
स्थलकाल परिस्थितीचा वेध घेणारी
वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी
अंतर्मनातील भावनांना साद घालणारी … .
अशी असावी कविता
वाचताक्षणी काळजाला भिडणारी
प्रत्येकाला जीवनदर्शन घडविणारी दुरावा दूर सारणारी
जिव्हाळ्याने मने जपणारी … .
अशी असावी कविता
मधुर शब्द गुणगुणणारी
सदा बडबडत ठेवणारी
प्रेमराग छेडणारी
दुःखातही बळ देणारी … .
जीवनात प्राण ओतणारी
जन्माधांनाही जग दाखविणारी …
अशी असावी कविता
आकाशा सारखी व्यापक
समुद्रासारखी अथांग
हिमालयाच्या उंचीची
गुंफण सुंदर स्वप्नांची . . . .
कविता नसावी केवळ शब्दांची जुळणी
असावी ती कविच्या अंतरंगाची चाळणी
अबोल , अव्यक्त भावनांची
शब्दात पाझरणारी गाळणी … .
अशी असावी कविता
सहज समजणारी
मैत्रिणीसारखी समजून घेणारी …
सौ. सरला टाले
राळेगाव यवतमाळ
0
4
8
2
9
0



