कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
स्मारके; संग्राम कुमठेकर
0
4
8
2
9
3
स्मारके
स्मारके सारी बोलू लागली
लागली डागू तीक्ष्ण शब्दास्त्र
शब्दास्रांनी येईल का जाग ?
कळेल का स्मारकांचा राग ?
निर्जीव मुर्ती सांगतेय किर्ती
खरंच मिळते का सांगा स्फुर्ती
विचारांना रे देऊन तिलाजंली
कोरडी का वाहता श्रद्धांजली
जीवंत ठेवा कार्यातून विचार
होऊ नका रे स्वार्थाने लाचार
अंधभक्तीत होता नतमस्तक
गहाण डोके दुष्टांचेच हस्तक
विचारांचे घरी ठेवा रे पुस्तक
वाचून सुदृढ बनवा रे मस्तक
ऐतिहासिक रे सत्याचा शोध
अचूक घ्यावा जीवनाचा बोध
मानवनिर्मित रे जात नि धर्म
धर्मापेक्षा रे श्रेष्ठ मानवी कर्म
ध्येयनिष्ठा नि कर्मनिष्ठा ठेवा
काढून मनातला धार्मिक हेवा
संग्राम कुमठेकर, लातूर
========
0
4
8
2
9
3



