Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

क्रिडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विजेत्यांचा सत्कार

रजत डेकाटे- प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

क्रिडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विजेत्यांचा सत्कार

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या हस्ते गौरव

रजत डेकाटे- प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर (दि २२) : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत आयोजित जिल्हा परिषद कर्मचारी अधिकारी क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा आबासाहेब खेडकर सभागृह जिल्हा परिषद नागपूर येथे पार पडला. भिवापूर येथील महिला शिक्षिका सघाने व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत यश संपादित केले.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन भिवापूर तालुक्यातील अनेक अधिकाऱ्यांना व महिला शिक्षिका संघाला, येथील गौरविण्यात आले.

प्रशिक्षक सुरज येल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघाचे व कर्णधार मेघा गुरनुले यांच्या नेतृत्वात संघातील शिला रोडे,ऊषा पराते, कुंदा घोडमारे, संगीता बनसोडे, आरती देवगडे या महिला खेळाडूंचा समावेश होता. तसेच 400 मीटर धावणे स्पर्धेत युवराज चव्हाण प्रथम तर प्रशांत अंबादे कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.

राजेश गोडे कनिष्ठ लेखाधिकारी यांनी ऐकलं नृत्य सादर केले होते त्यात त्यांनी ऐकलं नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. राजेश खिची अधिक्षक शिक्षण विभाग यांनी गायनामध्ये प्रथम क्रमांक पटकवला.

महिला शिक्षिका संघाच्या यशामागे प्रशिक्षक सुरज येल्ले यांनी अथक परिश्रम घेतले होते.या यशामुळे भिवापूर तालुक्यातील महिला शिक्षिका सघाने तालुक्यात दुसऱ्यांदा भिवापूर तालुक्याचा मान जिल्ह्यात उंचावला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे