Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरनाशिकमहाराष्ट्रसाहित्यगंध

प्रेमसाई गायकवाड ‘युवा कलारत्न’ पुरस्काराचा मानकरी

शिर्डी येथे १६ ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण

0 5 6 8 0 4

प्रेमसाई गायकवाड ‘युवा कलारत्न’ पुरस्काराचा मानकरी

शिर्डी येथे १६ ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण

विंचूर (ता. येवला) : राज्यस्तरीय मिमिक्री स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत येवला विद्या इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी प्रेमसाई शैलेश गायकवाड याने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावत विंचूर परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्रेमसाई हा ‘मराठीचे शिलेदार’ बहुउद्देशीय संस्था, नागपूरचे प्रसिद्ध कवी ‘शैलेश गायकवाड’ यांचे सुपुत्र आहे.

विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा व एस. एस. बी. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय मिमिक्री स्पर्धेत हिंदी व मराठी कलाकारांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रेमसाई गायकवाड याने आपल्या उत्कृष्ट आवाजाची नक्कल, सादरीकरण कौशल्य व प्रभावी अभिनयाच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळवला. या उल्लेखनीय यशाबद्दल प्रेमसाई शैलेश गायकवाड यांना ‘युवा कलारत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा १६ ऑगस्ट २०२६ रोजी शिर्डी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, गौरव पदक, महावस्त्र व तिरंगा फेटा देऊन गौरविण्यात येणार आहे.

प्रेमसाईच्या या यशामुळे येवला विद्या इंटरनॅशनल स्कूल तसेच विंचूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही कला क्षेत्रात उत्तुंग यश मिळवावे, अशा शुभेच्छा त्याला देण्यात येत आहेत. मराठीचे शिलेदार संस्थेच्या साहित्य दालनातूनही प्रेमसाईला साहित्यप्रेमी व काव्यरसिकांतर्फे भरभरून शुभेच्छा.
=======

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 6 8 0 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे