Breaking
अलिबागअहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरकविताकोकणक्रिडा व मनोरंजनखानदेशछत्रपती संभाजी नगरदादरा नगर हवेलीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

‘धडकी भरवणारी अस्वस्थता’; वृंदा करमरकर

सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण

0 1 8 4 0 1

‘धडकी भरवणारी अस्वस्थता’; वृंदा करमरकर

सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण

या निसर्गात साहित्यातील ‘नवरस’ ठायीठायी दिसतात. ही सृष्टीराणी नवरसांच्या नवरत्नांचे अलंकार लेवून सजली आहे.शृंगार रसापासून वीर, करुण, अद्भुत, शांत आदी रस. यातील भयानक बीभत्स, रौद्र रस हे उरात धडकी भरवणारे असतात. सध्या या रसांचेच दर्शन होत आह. ‘धडकी’ या विषयाच्या अनुषंगानं मला साधारण जुलैमध्ये आमच्या एका स्नेह्यांच्या बाबत घडलेली घटना आठवली. त्यांच्या नातवानं बारावीला छान गुण मिळवले. त्याला पुढील इंडस्ट्रीयल डिझाईनिंगच्या शिक्षणासाठी एका मोठ्या शहरातील महाविद्यालयात प्रवेश मिळाला. खूप फी असलेल्या त्या महाविद्यालयात होस्टेलसाठी पण भरमसाठ पैसे भरले. तो होस्टेलला राहिल्यानंतर आठ दिवसात त्यानं पालकांना बोलावून घेतलं.

कारण त्याचा जो रुम पार्टनर होता तो त्याच्या मित्रांबरोबर त्याच रुममध्ये ड्रिंक्स घेत होता. धूम्रपान तर होतच. सोबत अश्लिल बोलणं, गप्पा. हा मुलगा घाबरला. पालकांनी त्याला परत आणलं. भरलेले पैसे वाया गेलेच आणि सोबत वर्षही. इतक्या लहान वयात ही मुलं व्यसनांच्या विळख्यात? श्रीमंत लोकांची ही मुलं. वर प्राचार्यांनी कानावर हात ठेवले. हे सर्व ऐकता ना आमच्या काळजात अक्षरशः धडकी भरली. नैतिकतेची इतक्या वेगानं होणारी घसरण भीतीदायकच आहे.

सध्याच्या जगात आपल्या भोवताली काय दिसतं? देशात बेरोजगारी, महागाई, भूकबळी, कुपोषण, वृध्दांच्या समस्या, प्रदूषणाबरोबरच अराजक माजलं आहे. वाढते अपघातही चिंताजनक आहेत. राजकीय नेते आपल्या पोळीवर तूप ओढण्यात गुंतले आहेत. राजकीय घोडेबाजार तर नवा नाही. देशहिताचं ना कुणाला सोयरसुतक.आपण निवडून दिलेले उमेदवार योग्य कारभार करतील का ही सुध्दा भीती आहे. शेतकरी आत्महत्या, निर्भयांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्या हत्या, वासनांध लोकांच्या तावडीतून अजाण मुलं -मुली पण सुटत नाहीत.

जागतिक पर्यावरणात प्रचंड उलथापालथ होत आहे. सगळी परिस्थितीच अस्थिर आहे. अगदी सामाजिक, राजकीय भौगोलिक, आर्थिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रात उत्साहवर्धक चित्र दिसत नाही. पर्यावरणातील टोकाच्या बदलांमुळं ढगफुटी, सागरी वादळं, किनारपट्ट्यांना धोका पर्यावरण ऱ्हास होत आहे. हा अस्वस्थ भवतालच उरात धडकी भरवणारा आहे. आजच्या त्रिवेणी काव्यरचनेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘धडकी भरली ना’ हा विषय सोपा वाटला, तरी हिमनगासारखा विशाल अर्थ त्यात सामावलेला आहे. शिलेदारांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला आहे. पण अजून व्यापक विचार करण्याची गरज आहे असं वाटतं. सर्व शिलेदारांनी मनापासून अभिनंदन.

वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 4 0 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे