Breaking
ई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

पराकाष्ठा

दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)

0 4 8 2 8 6

पराकाष्ठा

धन्य होती पराकाष्ठा
राजमाता जिजाऊची
शिवबाच्या मनी स्वप्न
पेरिले सुस्वराज्याची ॥

धन्य होती पराकाष्ठा
महान शिवरायांची
तिनशे किल्ले जिंकले
स्वप्नपूर्ती जिजाऊंची ॥

धन्य होती पराकाष्ठा
शूर त्या बाजीप्रभूंची
राजांच्या सुरक्षेसाठी
वाट रोकली खिंडीची ॥

धन्य होती पराकाष्ठा
धाडसी हिरकणीची
बाळासाठी बाळगली
नाही तमा बुरूजाची ॥

धन्य होती पराकाष्ठा
नरवीर तानाजींची
कोंढाणा मोहिमेपुढे
पर्वा केली ना कशाची ॥

दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)
जि. धाराशिव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे