Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रसांगलीसाहित्यगंध

भावतरंग

वृंदा (चित्रा) करमरकर ता. जि. सांगली

0 5 4 7 4 5

भावतरंग

चिंब भिजल्या भावतरंगांचे
मेघ दाटले हे मम अंतरी
क्षितीजावरील भावरंगांची
उधळण हो माझिया उरी

नभांतरी या दूर दूर अशा
सांद्र घनावली दाटल्या
मनात भाव कल्पना
अधीर अधीरशा जाहल्या

सावळ्या या सोहळ्याने
ओढाळ असा प्रश्र्न केला
भेटशील मला तू सांग ना
जीव गं मम हा आतुरला

भेटू मी अशी कशी तुला?
सख्या तू असशी नभांतरी
जरी अंतरी ओढ अनावर
भूमीवरी रे मी भावभरी

रोज क्षितीज शलाकेवरी
भेट होतसे रे भासमान
त्या भेटीच्या कल्पनेतच
मम मना लाभे समाधान

वृंदा (चित्रा) करमरकर
ता. जि. सांगली
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 7 4 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे