Breaking
कविताक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 6 1 1 9 3

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*🥀विषय : हुकमी एक्का🥀*
*🍂बुधवार : २२/ जुलै /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*हुकमी एक्का*

मी रे उगाच नांदी ,लागत आता नाही!
मोडून जातो पण ,वाकत आता नाही!!

जुन्या आठवणी त्या,आठवतो विषारी!
ढाळले अश्रू तेव्हा , ढाळत आता नाही!!

भुंकणारे थांबले , एकाच झटक्याने!
मोकाट फिरणारे , चावत आता नाही!!

उघड्या छातीनेच , झुंजतो सदा येथे!
पाठीवर कुणाला , मारत आता नाही!!

खरेदी करायाची , औकात फक्त माझी!
उधार या बाजारी , मागत आता नाही!!

हे ऐश्वर्य लाभले , पुण्याई बाभीमाची!
स्वाभिमान जपतो , लाजत आता नाही!!

विसरुन मोगरा ती , स्वार्थाने दूर गेली !
गात्री गजरा कधी ,माळत आता नाही !!

अंगात टाय कोट , रुबाब हाय माझा !
चिंधीने तया परी , झाकत आता नाही !!

कलदार रक्त मी , हुकमी एक्का आहे!
भांडतो संयमाने , वाजत आता नाही!!

*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा.जि, यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👍🔰👍➿➿➿➿
*हुकमी एक्का*

निवडणूक आली जवळी
स्वार्थी मंडळी गोळा झाली
महागाईची होळी पेटली
आपली पोळी कुणी भाजली

हातात होता हुकमी एक्का
विरोधासाठी विरोध पक्का
एकदा मिळता सत्तेचा ठेका
कोण आपला कोण परका?

जनहिताचे ना सोयर सुतक
इथे कुणाला लागे पातक?
आपला स्वार्थ साधून घेण्या
जनहिताचे हो रंगले नाटक

इथे आपल्या पुरते पहावे
मतदारांनी शब्दा जागावे
मिळेल तेवढे पदरी घ्यावे
किती घोटाळे कुणी मोजावे

ज्याने त्याने तुंबडी भरावी
नाती कोणती कुणी जपावी
कशास नसत्या उठाठेवी?
खुर्चीवर नजर मात्र ठेवावी

असे वागतो तोची शहाणा
जनहित पाहे तोच दिवाणा
सत्तेपुढे चालते का शहाणपण
सदा शिकवण तुम्ही जाणा

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👍🔰👍➿➿➿➿
*हुकमी एक्का*

नशिबावर हवाला ठेवू नये
जीवनात करावा कष्टांचा प्रवास
घाम गाळावा, कामे करावीत मग
येतो खरेच यशाचा सुरेख सुवास….

येतील संकटे जीवनात खूप
संकटांना मात्र चार हात करावे
प्रत्येक नव्या दिवसाबरोबर
स्वप्नांच्या दुनियेत मात्र रमावे…

हुकमी एक्का तोच म्हणावा लागेल
जो संकटातही सर्वाशी छान वागतो
स्वतः उजळतोच पण इतरांनाही
स्वतःबरोबर चालायला लावतो…

ज्ञान, संस्कार, विचार, आचरण
हीच खरी आहे आपली शान
जो माणुसकी मनापासून जपतो
त्याचा समाजात मिळतो मान…

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी,जिल्हा – पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👍🔰👍➿➿➿➿
*हुकमी एक्का*

सरशी करण्यापेक्षा
नाते जपणे श्रेष्ठ
विश्वासाच्या धाग्यांनी
होतात नाते घनिष्ठ

नात्याची वीण नाजूक
जपावी हळुवार
प्रेम, संयम, समजुतीने
फुलतो संसार

अनेकदा शब्द सारे
ओठांवरती आले
पण विवेकाच्या इशाऱ्याने
माघारीच वळाले

कित्येक प्रश्न मनातील
अनुत्तरित राहिले
डोळ्यांतील ते अश्रूही
हसण्यात विरघळले

तो पराभव नव्हता
नव्हता मनाचा हार
नात्याच्या सन्मानासाठी
स्वीकारला संयम सार

कठीण प्रसंगी मौनच
ठरते हुकमी एक्का
प्रतिउत्तर टाळण्यातच
असतो शहाणपणाचा धक्का

*कु. माधुरी घनश्याम कावडे*
*ता. वणी जि. यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👍🔰👍➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हुकमी एक्का*

हुकमी एक्का मी बनणार
ध्येयासाठी झटत राहणार
संकटे येतील ही वाटेवरती
हसतहसत ती पार करणार

ज्ञानाची घेऊन मी शिदोरी
मेहनत असे मज जोडीदार
सत्य,प्रामाणिकता बळावर
यशाचे शिखर मी गाठणार

हार कधीही मानणार नाही
स्वप्नांना मी नाही सोडणार
कष्ट,जिद्द,आत्मविश्वासावर
यशाची सुंदर बाग फुलणार

देशासाठी काम करतांना
चांगुलपणाचा दीप धरणार
जीवनाच्या प्रत्येक रस्त्यात
हुकमी एक्का मीच ठरणार

नव्या पिढीचा युवक आहे
अन्यायाला वाचा फोडणार
बेरोजगारीचे स्तोम माजले
न्याय,हक्कांसाठी लढणार

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👍🔰👍➿➿➿➿
*हुकमी एक्का*

आयुष्याच्या या खेळामध्ये,
पत्ते सारे वेगवेगळे..
कधी नशिबाची साथ मिळते,
कधी येतात डाव अवघडले..

कधी संकटे वाट अडवती,
कधी प्रश्न उभे राहती..
पण हार मानत नाही जो कधी,
त्याच्या मुठीत जिंकण्याची शक्ती असती..

शांत राहतो, संयम धरतो,
वेळेची तो वाट पाहतो..
योग्य क्षण जेव्हा येतो,
तेव्हा सगळ्यांना मागे टाकतो..

नाही गर्व, नाही दिखावा,
कर्मावर त्याचा विश्वास असावा..
डाव कितीही कठीण असला,
जिंकण्याचा त्याचाच असतो दावा..

जगाच्या या रंगमंचावर,
प्रत्येकाची वेगळी कहाणी..
पण संकटसमयी पुढे येतो,
तोच खरा *”हुकमी एक्का”*
ज्याच्या धैर्यापुढे फिकी पडते,
नशिबाचीही सारी निशाणी..

*श्रीमती सिमादेवी बेडसे चाळीसगाव*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह…*
➿➿➿➿👍🔰👍➿➿➿➿
*हुकमी एक्का*

मनाच्या पत्त्यात दडलेला असतो
हुकमी एक्का खास
अडचणींच्या खेळात देतो
तोच जिंकण्याचा विश्वास..!!

भीती आली समोर जेव्हा
थरथरली जराशी छाती
तेव्हा आठवतात आपली
धीर देणारी सर्वच नाती…!!

कधी वाटते हरलो आता
आणि सगळे मार्ग मिटलेले
तेव्हाच आतून उठतात मग
स्वप्नांचे दिवे सारे पेटलेले..!!

हातात नसला सोपा
तरी असतो एक डाव
शिकण्याचा झगडण्याचा
न थांबणारा दृढ भाव…!!

हुकमी एक्का म्हणजेच
मनातली खरी जिद्द मोठी
संकटांच्या पत्त्यांवरची ती
आहे विजयाची खूण छोटी..!!

म्हणून खेळत राहा धैर्याने,
आयुष्याच्या या रस्त्यावर
हुकमी एक्का तुमचाच मग
चमकेल प्रत्येक वळणावर…!!

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👍🔰👍➿➿➿➿
*हुकमी एक्का*

हाती नसेल हुकमी एक्का
तरी खेळायचा जीवनाचा डाव
वादळं,वैफल्य, संघर्ष जरी
जिद्दीच्या वल्हाने पार करू नाव

नको ते औदार्य, नको ती करुणा
उध्वस्त होताना ही असावी सहनशीलता
मनात जपून ठेवू हीच प्रेरणा
कधीतरी नक्की लाभेल स्थिरता

एक ना एक दिवस स्थिरा वेल नौका
मनाला देऊया हीच ग्वाही
कधीतरी मिळेल तो हुकमी एक्का
मनाचा निश्चय ठाम आहे पक्का

ही माझी खात्री नाही
अढळ विश्वास आहे खरा
मला कधीच हरू देणार नाही
ध्येयरुपी गाठेन नक्कीच किनारा…..
नक्कीच किनारा…

*सौ स्नेहल संजय काळे*
*फलटण सातारा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👍🔰👍➿➿➿➿
*हुकमी एक्का*

अंधेर नगरीत
वाटते आहे सगळं आलबेल
वरवरची शांतता
खोलवर गुढ अस्वस्थता
कोरडे हुंदके
सोबत बसलेला घसा
स्वप्न पाहणारी नजर
आज भलतीच सैरभैर
समोरची वाट धूसर
मार्ग गडद काळोखात
सावलीनेही सोडली साथ
करायचे तर आजच सारे
आहे जोवर जीवात जीव
लढणारे हात हजारो
कर्दनकाळ झालाय काळ
आता मात्र थांबायचे नाही
रक्ताळली जरी पाऊलवाट
हुकमी एक्का घावलाय हाती
सूर्य उद्याचा आपलाच गड्या

*सविता धमगाये*
*नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿👍🔰👍➿➿➿➿
*हुकमी एक्का*

चहूकडे दाटू पाहतोयं
अन्यायाचा घोर तम
करू लागले विटंबना ते
लोकशाहीची द्रोपदीसम

मोडून काढले वांगचूकचे
उपोषणाचे खंबीर द्वद
राष्ट्रमाताही आज आमची
गांधारीसम झाली अंध

मग आम्हीच अमुच्यासाठी
झालो आज हुकमी एक्का
अधिकारासाठी लढण्याचा
मनात विचार केला पक्का

गांधीच्या तत्वावर आम्ही
चालत होतो वाट पुढे
पुढ्यात येऊन उभे ठाकले
कौरवांचे वर्दीतील रणगाडे

मग झालो आम्ही भगतसिंग
गांधीचा सोडून अहिंसावाद…
नारा घुमला बा भीमाचा
होऊ द्या इथे संघर्षनाद…

हक्कासाठी विद्यार्थ्याच्या
क्षणात आम्ही झालो पांडव
सत्ताधारी मग्रूर कौरवांपुढे
न्यायासाठी केलो तांडव..

लाठीचार्ज,अश्रूधूरकांड्यांनी
जरी केली त्यांनी दडपशाही..
विसरू नका सत्ताधाऱ्यांनो
न्याय देईल या बोटावरील शाही

*सौ वनिता गभणे*
*आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👍🔰👍➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 1 1 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे