0
4
8
2
9
0
झिजलेला देह
झिजलेला देह घेऊन
चल जरा बसू निवांत
काय कमावले काय गमावले
आता कशाला करायची खंत ॥
दाणा दाणा टिपून
चोचीत भरविले पिलांना
उन्हातान्हात राबून
घरटे सजविले एव्हाना ॥
अक्षरज्ञान नसले जरी
मुलांच्या शाळेत डोकाऊन
समाधान वाटे मनाला
उंच भरारी घेतांना पाहून ॥
चिमणा चिमणी गेली उडून
नविन घरटी बांधायला
निसर्गाचा नियम हा
वाट द्यावी सृजनाला ॥
झिजलेला देह घेऊन
तेही बघतील मागे वळून
काय कमावले काय गमवले
नक्कीच येईल त्यांनाही कळून ॥
सौ. सरला टाले
राळेगाव यवतमाळ
=======
0
4
8
2
9
0



