ऋणनिर्देश आभारीय शब्दसुमने; बी एस गायकवाड
दोन शब्द आभाराचे, समूहाप्रती कृतज्ञतेचे...!

ऋणनिर्देश आभारीय शब्दसुमने; बी एस गायकवाड
दोन शब्द आभाराचे, समूहाप्रती कृतज्ञतेचे…!
बिनधास्त न्यूज नेटवर्क
‘तुमचा फोटो पाठवा’..आदरणीय राहुल सरांचा जादुई फोन संदेश, ज्याची सर्वांनाचं आतुरता असते. परंतु ज्याला कोणाला मॅसेज येतो. त्याचा आनंद काही औरच असतो. त्याची अनुभूती प्रत्येकाला योग्य वेळी येते. तशीच मला आज आली.चालू घडामोडीवर आधारित किंवा प्रसंगोपात आदरणीय राहुल सर विषय देतात. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला विषय म्हणजे भोंदूबाबा ज्योतिषी अशोक खरात… आणि त्यांचे कारनामे. उघड पडलेले त्याचे पितळ आणि त्याची दुष्कृत्ये.
असे विषय म्हणजे या आधी ही घडलेली अंधश्रद्धा व त्याला बळी पडलेली जनता. केवळ आडाणी जनताचं नाही तर सुशिक्षित राजकारणी, अधिकारी ,आणि विशेषता महिला वर्ग याला बळी पडलेला आहे. असे अनेक भोंदूबाबा, ज्योतिषी समाजात वावरत असतात. कधी ना कधी यांची पोलखोल होते. आणि त्याचे दुष्कृत्य बाहेर पडते.
याचं आशयाच्या दोन रचना काल दोन समूहात लिहिल्या. पैकी एक रचना “आजची सर्वोत्कृष्ट रचना” म्हणून एक रचना सन्मानित करून सर्वोत्कृष्ट रचननेचा सन्मान प्राप्त करून सन्मानित करण्यात आले. त्याबद्द्ल सर्व प्रथम मराठीचे शिलेदार समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रशासक आदरणीय राहुल दादा, सचिव पल्लवी ताई,मुख्य परिक्षक सविताताई ठाकरे सह स्वातीताई मराडे, शर्मिलाताई , आ.वृंदाताई आ.तारकाताई , प्रतिमाताई, विष्णू दादा, संग्राम कुमठेकर सर, अशोक लांडगे सर, प्रशांत सर, अरविंद उरकुडे सर आणि सर्व परीक्षक, सह परीक्षक , संकलक ,आपणा सर्वांचे मनःपूर्वक खुप खुप धन्यवाद.तसेच काव्य लिखाणास वेळोवेळी प्रेरणा देऊन प्रेरित करणारे मराठीचे शिलेदार समूहाचे सर्व ताई, दादा आपणा सर्वांचे मनःपूर्वक खुप खुप धन्यवाद.
माझ्या ‘भोंदूबाबा’या परखड,वास्तव काव्य रचनेस सर्वोत्कृष्ट रचनेचा मान देऊन सन्मानित केले आणि माझी रचना सार्थकी लागल्याचे मला समाधान लाभले .समूहाच्या सदैव ऋणाईत राहणे पसंत करतो. आणि माझे लांबलेले मनोगत संपवतो.
बी एस गायकवाड
पालम,परभणी
सदस्य,मराठीचे शिलेदार समूह



