Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरपश्चिम महाराष्ट्रपुणे

कात्रज येथे ‘दीपोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात

वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे

0 4 8 2 9 4

कात्रज येथे ‘दीपोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात

वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे

पुणे: (दि १७) हुजूरपागा गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूल, मांगडेवाडी, कात्रज येथे दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी “दीपोत्सव २०२५” हा दिवाळीचा आनंददायी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

यंदा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे २०२५ हे ७५० वे जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे, त्यानिमित्ताने हा दीपोत्सव श्री ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सर्जनशीलता, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम दिसून आला. यानिमित्ताने ज्ञानेश्वरांच्या विविध अभंगांचे विद्यार्थिनींनी गायन केले.

याशिवाय मी आणि आई- सॉलिड टीम या उपक्रमातून तोरण बनवणे, वडील-मुलगी यांच्यासाठी किल्ला बनविणे, विद्यार्थिनीसाठी पोस्टर बनवणे अशा विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले, ज्यामुळे कौटुंबिक नाती अधिक दृढ झाली. तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.

“देणे समाजाचे” या सामाजिक उपक्रमांतर्गत स्नेहालय फाउंडेशनसाठी धान्य संकलन मोहीम आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी व पालकांनी साखर, गहू, तांदूळ अशा वस्तूंचे दान करून दिवाळीचा खरा संदेश — “आनंद वाटण्यातच खरा सण” — प्रत्यक्षात उतरवला. संस्थेतील लेखनिक श्रीमती आसावरी गोरे यांनी पसायदान सुंदर आवाजात सादर करून वातावरण प्रसन्न केले.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी च्या अध्यक्ष श्रीमती शालिनीताई पाटील ,सचिव श्रीमती रेखा पळशीकर सहसचिव श्रीमती डॉ.अरुणा भामरे, सभासद श्रीमती अरुणा तिवारी ,सभासद श्री लक्ष्मीकांत मुंदडा, सभासद श्रीमती अलका काळे, विश्वस्त श्री दुष्यंत घाटगे , माजी विश्वस्त श्री का. बा .पारखी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका श्रीमती कीर्ती पंडित व पर्यवेक्षिका श्रीमती अर्पिता कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे