Breaking
ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

शततारका

स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, पुणे

0 4 8 2 8 6

शततारका

लक्ष्मण गेला वनवासी
भ्राता धर्म निभवायला..
पण खरा वनवास तर भोगतेय
राजवाड्यात ही उर्मिला..

विरहात तुझ्या आठवणींनी
उरी हुंदका दाटलाय
मनाच्या गाभा-यात
दूरवर काळोख भरलाय..

मखमली शय्येवरही
काटे मज टोचती
कासावीस तुज पहायला
भिरभिरते नयनज्योती..

शततारका ओंजळीत घेऊन
वाट पहातेय तुझी
चांदणसुख उधळण्या
आतुर अंजली माझी..

बरसतील शततारका
फुलेल सारी सृष्टी
तृप्त नयनातून माझ्या
होईल आनंदाची वृष्टी..

स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे