0
4
8
2
9
3
सोप्प नाही
सोप्प नाही
शेणगोळे झेलून
ओले लुगडे बदलून
परत नव्या दमानं
शिकवणं हसत मुखानं
सोप्प नाही
जातीयतेचे चटके साहने
अन्यायाविरुद्ध उभे राहणे
प्रयत्न केला पाडण्याचा तरी
नवा धम्म जगाला देणे
सोप्प नाही
राजेशाही सोडून
देहाच्या वासना मारून
ईश्वराचा शोध घेणे
शेवटी अंतरात ईश शोधणे
सोप्प नाही
जगावेगळे करण्यासाठी
बंड पुकारून उठणे
नव्या विचारावर ठाम राहणे
प्रसंगी विष पचवून घेणे
सोप्प नाही
प्रवाहाविरुद्ध जाणे
पर्वा जनाची सोडून
वाट नवी पकडणे
त्या वाटेवर सर्वांना नेणे
सविता धमगाये
ता. जिल्हा नागपूर
0
4
8
2
9
3



