
0
5
9
6
9
7
दमडी
कवडीमोल जगणं आमचं
फक्त भुकेसाठी लढायचं
नाहीच मिळाली भाकर तर
अश्रूंनाच गिळायचं
पोटात भूक असली तरी
हातात दमडी नसायची
मग वाट पहायची फक्त
पोटातली भूक मरायची
एकच सपान असे डोळ्यात
भाकरीच्या चंद्राचं
हाताला मिळेल ते काम करून
मिळणाऱ्या दमडीचं
दमडीसाठी तयारी आमची
उन्हातान्हात राबायची
थंडीला लपेटून घेऊन
घामाच्या धारेत भिजायची
दमडी हाती पडताच
आवताण चुलीला मिळायचं
अन् दीडदमडीचं सपान
आमचं पुरं व्हायचं..!
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर पुणे
0
5
9
6
9
7



