संत रोहिदास,माई रमाई यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती साजरी
शहर प्रतिनिधी नागपूर
संत रोहिदास,माई रमाई यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती साजरी
शहर प्रतिनिधी नागपूर
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर (दि.७): आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा नागपूर शहराच्या वतिने आज कास्टाईब कार्यालयात संत रोहिदास, त्याग मुर्ति रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यशील बोदिले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून समाज भूषण तन्हा नागपुरी, ओबीसी नेते राजू दादा पांजरे रामभाऊ वाहणे हे होते.
प्रथम आंरिमोचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार अर्पण केले सुरज ढोणे यांनी दिपप्रज्वलन केले तन्हा नागपुरी, ओबीसी नेते राजू दादा पांजरे यांनी महापुरुषांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमेश दुपारे यांनी केले तर आभार प्रदर्शन हंसराज उरकुडे यांनी केले. कार्यक्रमात प्रकाश कांबळे, धर्माजी बागडे, कैलास खरात, शालिक बांगर राजु कांबळे चरणदास गायकवाड, अभिषेक मिश्रा, रोहित पांडे, राहूल द्विवेदी उपस्थित होते.



