मातेचे संस्कार–दोन क्लेक्टांराना
कुसुमलता दिलीप वाकडे उमरेड रोड, नागपूर

मातेचे संस्कार–दोन क्लेक्टांराना
“प्रत्येक पुरूषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतोे” हे तेवढेच सत् अशी तशी स्त्री नाहीतर, ‘पाॅवरफुल माता’ तिच्याकडे पाहिल्यानंतर ती गावातील साधीसुधी बाई वाटते. पण ती कुणी साधी बाई नसून आपल्या तीन मुलापैकी दोन मुलांना शिकवून कलेक्टर आयुक्त अशा प्रशासनातील सर्वोच्च पदावर असलेल्या मुलांची आई होती.
होय, नुकतेच आता वयाच्या शंभरव्या वर्षी दिनांक 2 एप्रिल 2026 ला निधन झालेल्या कपाळावर ठसठशीत कुंकू, अंगावर ग्रामीण वेशभुषेतील लुगडं, कष्टाने रोपलेले शरीर अशी वेशभूषा असलेल्या आयएएस अधिकारी आदरणीय आयुक्त तुकाराम मुंढे आणि निवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे यांच्या आई ‘आसराबाई हरिभाऊ मुंढे’ यांची प्रेरणादायी कहाणी.
एका ऊसतोड कामगाराच्या घरात जन्म झालेल्या आणि तशीच पार्श्वभूमी असलेल्या, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्य़ातील (ताडसोनना) गावातील. जी प्रत्येक आईच्या सामर्थ्याची जाणीव करुन देते. आसराबाई यांनी अत्यंत साध्या परिस्थितीत शेती करत आपल्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिलेत. घरची परिस्थिती हलाखीची असली तरी मुलांच्या शिक्षणाबाबत तडजोड केली नाही.”शिक्षण आणि प्रामाणिकपणा हा माणसाला मोठं बनवतात.” हा त्यांचा विश्वास होता. दोन मुले कलेक्टर तर एका मुलगा प्राध्यापक आहे.
आईनी घडविलेले सुसंस्कार आणि म्हणूनच तीनही मुलं विद्याविभूषित आहेत. दोन मुलांनी मोठी स्वप्ने पाहिलीत आणि ती पूर्ण केलीत. प्रशासनात उच्च पद गाठत देशसेवेचा मार्ग निवडला. तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रामाणिक, धाडसी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या याच कार्यामुळे त्यांचे स्थानांतर गाजलेला विषय आहे. जवळपास एकवीस वर्षाच्या कारकिर्दीत त्याची ही पंचवीसवी बदली आहे. त्यांनी जिथे जिथे काम केलेत तिथे शिस्त, पारदर्शकता आणि भष्ट्राचारविरूध्द कठोर भूमिका घेतली. त्यांच्या कामामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाबद्ल विश्वास निर्माण झाला.
यापूर्वी दिव्यांग विभाग कल्याणचे सचिव असताना दिव्यांगाची बोगस प्रमाणपत्रे जोडून नोकऱ्या मिळविणाऱ्या कर्मचारी,अधिकाऱ्यांना निलंबित करणे, बोगस दिव्यांग संस्थाची नोंदणी रद्द करणे आदीचा छडा त्यानी लावला. सध्या आदरणीय तुकाराम मुंढे हे महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्याचे मोठे बंधु निवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक मुंडे यांनीही आपल्या कार्यातून आईच्या संस्काराचा मान राखत प्रशासनात उल्लेखनीय योगदान दिलेत.या यशामागे कोणताही मोठा वारसा नव्हता, मोठी संपत्ती नव्हती. होते ते फक्त आईचे संस्कार, कष्ट आणि शिक्षणावर असलेला अढळ विश्वास.
(संकलित लेख)
कुसुमलता दिलीप वाकडे
उमरेड रोड, नागपूर
==========



