
0
5
2
4
6
3
गाव तसं चांगलं
कितीही गरिबीने गांजलं
भ्रष्टाचारात सबंध भंगलं..
चिरीमिरीचे वाढले प्रस्थ
तरी म्हणा गाव तसं चांगलं..
वीज, पाणी मुबलक त्यांना
श्रीमंतांनी फक्त मज्जा करावी..
अंधारात चाचपडणाऱ्याने फक्त
काय भलीमोठी वीज बिले भरावी..
गाव तसं चांगलं म्हणणाऱ्यांपुढे
कशी मांडावी लोकशाहीची गाऱ्हाणी..
एकाच माळेचेच सगळे मणी
किती चांगले तरी मुरते कुठेतरी पाणी…
गाव तसं चांगलं होतं पण
पणालाच तर लागली कीड सारी..
एकेकाळीचे समृद्ध, सुंदर प्रदेश
आज कुरूप,अस्वस्थ अन् लाचारी..
गाव चांगले अन् समृद्ध होण्यासाठी
बदलले पाहिजे विचार नि राजकारण…
सामान्य जनतेच्या हितासाठी फक्त
निःस्वार्थपणे राबवावे विकासाचे धोरण…
मृदुला कांबळे
गोरेगांव, जि.रायगड
0
5
2
4
6
3



