
0
5
9
8
7
7
युध्द नको बुध्द हवा
अरे विश्वशांतीसाठी,युध्द नको बुध्द हवा ।
बुध्दाला शरण जाऊन ,धम्मंचक्र फिरवा।।
जीवनात सारं काही ,हरवितो लोभापायी।
अंतरी शुध्द होऊन , रुजवा विचार नवा।।
सत्कर्माची गोड फळे,हि आयुष्याची पावती।
कामाची नाहीच कुणा ,ती भोंदूची दवा दुवा।।
एकटाच आलास तू , एकटा जाशील गड्या।
जीवाला जीव लावरे, भरोसा नाही परवा।।
पंचशीला अष्टांगाला ,आचरणात असावे।
हेच जीवन निर्वान,आनंद मौज जलवा।।
प्रज्ञा शील करुणेचा ,अहिंसा अन शांतीचा।
धम्मं मैत्रीचा दिधला,कल्याणकारी मानवा।।
अज्ञाना दूर करुनी ,होऊ प्रकाशित आता।
गातील सदैव तेव्हा, सारे अत्त दीप भवा।।
मानवता हिच खरी, माणसास तारणारी।
वैरत्वाचे विष विषारी,ते मनातूनी हटवा।।
निळे झाले आभाळ,निळी झाली वसुंधरा।
या निळाईत रंगून पुन्हा गाववस्ती रंगवा।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा. जि यवतमाळ
======
0
5
9
8
7
7



