Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपुणेमराठवाडामहाराष्ट्र

अक्षरवर्स पब्लिकेशन बार्शी भव्य पुस्तक प्रकाशन, बक्षीस वितरण सोहळा व निमंत्रितांचे कवी संमलेन

वसुधा नाईक पुणे, प्रतिनिधी

0 5 4 7 4 5

अक्षरवर्स पब्लिकेशन बार्शी भव्य पुस्तक प्रकाशन, बक्षीस वितरण सोहळा व निमंत्रितांचे कवी संमलेन

पब्लिकेशनच्या सुरुवातीलाच तीन पुस्तकांचे एकाच वेळी प्रकाशन

वसुधा नाईक पुणे, प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

पुणे: (दि २५) पुणे येथे अक्षरवर्स प्रकाशन यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य पुस्तक प्रकाशन सोहळा, बक्षीस वितरण आणि कवीसंमेलनाचे आयोजन उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटक मा. प्रा. शरदचंद्र काकडे (एकपात्री कलाकार), अध्यक्षस्थानी मा. सीताराम नरके (साहित्यिक, सेवा निवृत्त पोलिस), विशेष उपस्थिती मा. संदीप राक्षे (कवी, लेखक, निर्माता), प्रमुख पाहुणे मा. मोहन जाधव (गझलकार, निवृत्त पोलिस आयुक्त), मा. गौरव पुंडे(अध्यक्ष, राजयुवा प्रतिष्ठान) यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात “आंबट गोड”, “भीम विचारांचे मोती” आणि “प्रतिक्षा” या तीन प्रतिनिधिक काव्यसंग्रहांचे एकाच वेळी प्रकाशन करण्यात आले. पहिल्याच प्रकाशन सोहळ्यात तीन पुस्तकांचे प्रकाशन होणे ही विशेष बाब ठरली. “भीम विचारांचे मोती” या काव्यसंग्रहाचे संपादन योगेश हरणे आणि तुषार पालखे यांनी केले, तर “प्रतिक्षा” या काव्यसंग्रहाचे संपादन रेश्मा पुजारी यांनी केले. “आंबट गोड” या पुस्तकाचे संपादन योगेश हरणे यांनी केले.

अक्षरवर्स प्रकाशनतर्फे “भीम विचारांचे मोती” या विषयावर आयोजित काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी गजानन उफाडे यांनी केले. कार्यक्रम कात्रज, पुणे येथे पार पडला. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन प्रकाशक तुषार पालखे, योगेश हरणे आणि संगम उबाळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 7 4 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे