0
4
8
2
9
4
स्वरांगण
जग हे सारे मृगजळ कान्हा
तू एकमेव सत्य..
तुझ्याच स्मरणात जगावे
क्षण क्षण मी नित्य..
चराचरात फक्त दिसावी
चक्षूला या तुझीच मुर्ती..
या मुखातून गात रहावे
तुझी नि तुझीच किर्ती..
स्पंदन हे तुझ्याचसाठी
तुच माझा श्वास..
हृदयगाभारी जपले तुजला
नको तनाचा सहवास..
राजपुतानी मी बावरी
जगास वाटते वेडी.
तुझ्याचसाठी झाली जोगण
प्रेमाची घालून बेडी..
शब्द तूच , सूर तूच
तूच मनातील भाव..
फुलवेन स्वरांगण तुझसाठी
मीरा माझे नाव…
वनिता गभणे
आसगाव भंडारा
==≠=========
0
4
8
2
9
4



