Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

‘आभारीय शब्दसुमनांजली’; विष्णू संकपाळ

हा तर सर्वोत्कृष्ट रचनेचा सन्मान

0 4 8 2 8 7

आभारीय शब्दसुमनांजली’; विष्णू संकपाळ

हा तर सर्वोत्कृष्ट रचनेचा सन्मान

साडी कोणत्याही रंगाची
ती शान असते नारीची
अस्सल सौंदर्याला खुलवते
काय वर्णावी महती नऊवारीची

“गुलाबी साडी आणि…!” हा विषय वाचला आणि किंचित विचारात पडलो की, आ.राहूल दादांनी यावेळी “गुलाबी साडी” च्या पुढे “आणि” हा शब्द का घातला असावा? कधी कधी प्रश्नांकित विषय असतात तेव्हा सुद्धा प्रश्न पडतोच की काय लिहावे? शिवाय साडी गुलाबीच का? यात कांही गुलाबी गुपीत असेल का? हा पण विचार आलाच. दिवाळीची धामधूम आणि साडीचा विषय.! तसाही हा महिलांचा प्रांत.. आपण काय तारे तोडावे हा प्रश्न होताच..
पहिली दोन कडवी लिहिली आणि जाणवले की, विषय साडी बाहेर चाललाय… थोडा थांबलो आणि फक्त साडीवरच लिहायचे मात्र स्री सौंदर्याची जोड द्यायची असा विचार करून पुढचा शब्दप्रपंच मांडला.. आणि ही रचना परिक्षकांना भावली..

खरे तर रूबाबदार नऊवारी ही महाराष्ट्रीयन नारीची खरी ओळख आहे. अंगभर परिधानले जाणारे, स्री सौंदर्याला चार चांद लावणारे, खानदानी परंपरा जपणारे, एक आदर्श वस्त्र म्हणून नऊवारीकडे पाहिले जाते. चापून चोपून घातलेला बहारदार काष्टा, कमरेला चांदीचा कमरपट्टा, डोक्यावरून घेतलेला नाचरे मोर असणारा पल्लेदार पदर. भाळावर ठसठशीत कुंकू, नाकात नथनी, हातात कोपरापर्यंत हिरवा चुडा, गळ्यात कोल्हापूरी साज असा नऊवारीचा शृंगार म्हणजे खानदानी आदबशीर नार… विशेषतः महाराष्ट्रियन लोककलापैकी लावणी या कलेने नऊवारीला सातासमुद्रापार पोहचवले. खरेतर नऊवारीमध्ये स्री देहाचे किंचितही प्रदर्शन होत नसून एक आदर्श पेहराव नारीचा भारदस्तपणा खुलवून जातो.

आजकाल मात्र लग्नसमारंभ आणि सणावारापुरतीच एक हौस म्हणून नऊवारी वापरली जाते.. जीन शर्ट, सलवार, सहवार, चुडीदार, पंजाबी या बाहेरच्या पोशाखांच्या चलतीमध्ये मूळ महाराष्ट्राची ओळख कालबाह्य होते की काय? असाच प्रश्न पडतो. लाज अबाधीत राखणारा पदर फक्त नऊवारीला असतो.जो आभाळाची छाया, आणि माईची माया असतो. तोच पदर लेकराला झाकतो, आणि खूप कांही… असो..!

समूह प्रमुख आ. राहूल दादां, मुख्य परिक्षक प्रशासक आ. सविताताईजी, पल्लवीताईजी, आ. वैशालीताईसाहेब, आ. स्वातीताईंजी, आ. वृंदाताईजी, आ. संग्राम दादा, आ. लांडगे दादा, आ. उरकुडे सर जी, आ. तारकाताईजी, आ. सुधाताईजी, आ. शर्मिलाताईजी. सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.. तसेच अभिनंदनीय शुभेच्छा देऊन मला प्रोत्साहित केल्याबद्दल सर्व समूह सहकार्‍यांचे देखील मनःपूर्वक खूप खूप आभार.

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे