कत्तलीसाठी जाणाऱ्या 38 गोवंशाला मिळाले जीवनदान
प्रतिनिधी, अखिल राजू रोडे
कत्तलीसाठी जाणाऱ्या 38 गोवंशाला मिळाले जीवनदान
सिर्सी पोलिसांची पंधरा दिवसात धडक कार्यवाही
बेला पोलिस निरीक्षक उमेश नासरे यांच्या धडक कार्यवाहीमुळे अवैध तस्करांचे धाबे दणाणले
प्रतिनिधी, अखिल राजू रोडे
उमरेड/ सिर्सी: सिर्सी पोलिस चौकी हद्दीतील खातखेडा शिवारात दि.७/१/२०२६ रोज पहाटे ३ वा. बुधवार ला सीर्सी पोलिस चौकी इंचार्ज असलम नवरंगाबादे, अमोल कोठेवार, नितेश उपरे पेट्रोलिंग करत असतांना गुप्त माहिती मिळाली की उमरेड मार्गे पांढऱ्या रंगाचे टाटा कंपनीचे आयसर गाडी क्र. MH 49 AT 2781 मध्ये गोवंश अवैधरीत्या कत्तलीसाठी जात आहे.
पोलिस पेट्रोलिंग वाहन पाहून आयसर ड्रायवर ने वेग वाढवला सोबतच पोलिस कर्मचाऱ्यांनी आयसर गाडी च पटलाग केला असता. आयसर गाडी रोड कडेला सोडून ड्रायवर फरार झाला. आयसर गाडीची झडती घेतली असता अत्यंत निर्दयीपणे दोरखंडानी बांधून कोंबून आढळले. हे गोवंश हैदराबाद येथे कत्तल खाण्यात कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा संशय आहे. पंचासमक्ष आयसर गाडीची पहणी केली असता पांढऱ्या रंगाचे गोरे, गाई, कालवड, आयसर गाडी असा एकूण १७,८२,००० रू चा मुद्देमाल जप्त केला.
अज्ञात आरोपी विरोधात भारतीय न्याय सहिता अंतर्गत कलम 325,3(5) सह कलम 11 (1) , प्राण्यांचा छडप्रती कायदा अंतर्गत कलमासह गुन्ह्याची नोंद बेला पोलिस स्टेशन येथे करण्यात आली. सर्व गोवंशाची आरोग्य तपासणी करून औदुबरं गोशाळा रुही खैरी येथे पाठविले.
पुढील तपास निरीक्षक उमेश नासरे यांच्या मार्गदर्शनात सहपोलिस निरीक्षक खडेराव बोडगीर सहकार्याने पोलिस हवालदार असलम नवरंगाबादे, पोलिस नायक अमोल कोटेवार पोलिस शिपाई नितेश उपरे करीत आहे. संपूर्ण कार्यवाहीत सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत मुंजे यांनी सहकार्य करतांना दिसून आले.



