Breaking
अलिबागकोकणरायगड

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची २३ वी शाखा पाली – सुधागड येथे प्रारंभ

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 6 1 1 8 5

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची २३ वी शाखा पाली – सुधागड येथे प्रारंभ

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग (दि ०९ ): अलिबाग येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची पाली-सुधागड येथील शाखा सुरू करण्यात आली आहे. आदर्श पतसंस्थेची ही २३ वी शाखा आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाली-सुधागड शाखेचे उद्घाटन मंगळवारी ( दि. ८ ) ग. बा. वडेर हायस्कूल उपाध्यक्ष श्री. रवींद्र लिमये , रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे व संस्थेचे संस्थापक श्री सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, पाली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पराग विजय मेहता , रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे , ग. बा. वडेर हायस्कूल उपाध्यक्ष रवींद्र लिमये , पाली व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक मेहता ,जनकल्याण पतसंस्था पालीचे अध्यक्ष चंद्रकांत (दादा) घोसाळकर, अष्टविनायक पतसंस्था नागोठणे अध्यक्ष विलास भाई चौलकर , श्री आलाप अशोक मेहता पाली व्यापारी असोसिएशन अध्यक्ष, प्रतिष्ठित व्यापारी इंदरशेठ परमार , जागा मालक अशोकशेठ ओसवाल , प्रतिष्ठित व्यापारी दीपकशेठ ओसवाल , प्रवीणशेठ कोठारी, राजेंद्र (भाऊ) गांधी, पाली मधील उद्योजक श्री. सूरज शेळके , आदर्श नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील , संचालक विलाप सरतांडेल , संचालक भगवान वेटकोळी , संचालक संजय राऊत , आदर्श पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मीनाक्षी पाटील हे यावेळी उपस्थित होते .

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे , जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्र्कांत घोसाळकर , ग. बा. वडेर हायस्कूल उपाध्यक्ष व रवींद्र लिमये , पाली व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक मेहता यांनी आपले मनोगत व्यक्त केले . यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री अभिजीत पाटील यांनी एकंदर संस्थेची वाटचाल , तसेच पाली येथे संस्थेची शाखा काढण्यामागची कारणे याबाबत आपले विचार व्यक्त केले व संपूर्ण पाली – सुधागड च्या नागरिकांना आदर्श पतसंस्थेच्या पाली शाखेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 1 1 8 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे