कवितानागपूरनांदेडमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
प्रेमाचं आॕडिट; बळवंत डावकरे
0
4
8
2
8
7
प्रेमाचं ऑडिट
जीवाभावाची दोस्ती
अन् विश्वासाचं नातं
मैत्रीच्या दुनियेत या
प्रेमाचं ऑडिट नसतं
घालता साद एकदाच
प्रतिसाद झणी मिळतो
न सांगता संकटसमयी
सौदामिनी वेगाने धावतो
खट्याळ खोडकर मित्रत्व
आजही आम्ही सांभाळतो
रंक नि राव असा भेदाभेद
कधीच आमच्यात नसतो
भरवशाला तिलांजली
प्रेमाचं ऑडिट करणं
नात्यानात्यातील वीण
वारंवार असतं तपासणं
बसवुया मित्रा ताळमेळ
अजाणतेपणीच्या चुकांचा
पुनरावृत्ती नको वारंवार
आदर राखू एकमेकांचा
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
=========
0
4
8
2
8
7



