जि. प. माध्यमिक विद्यालय, अंबाझरी नागपूरची उत्तुंग भरारी
अंकित अनंत भारसाकळे 91% गुण प्राप्त करून सर्वप्रथम
जि. प. माध्यमिक विद्यालय, अंबाझरी नागपूरची उत्तुंग भरारी
अंकित अनंत भारसाकळे 91% गुण प्राप्त करून सर्वप्रथम
नागपूर: जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय, अंबाझरी. (ऑर्डनन्स फॅक्टरी) नागपूर येथे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2025 एकूण प्रविष्ट विद्यार्थी संख्या 32 आहे. शाळेतून प्रथम क्रमांक अंकित अनंत भारसाकळे 91% द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वर जाधव 86%, तृतीय क्रमांक समीर अंबादे 83% असून नागपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागातील एकूण माध्यमिक विद्यालयातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय अंबाझरी. शाळेचा विद्यार्थी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये अंकित अनंत भारसाकळे जिल्हा परिषद नागपूर मधून जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. जि.प.माध्यमिक शाळेचा निकाल ९७% लागला आहे.
मुख्याध्यापिका वर्षा यावले मॅडम,वर्गशिक्षिका श्रीमती शरयू सांबारे मॅडम , शा. व्य.स. अध्यक्ष मालतीताई कडू, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष अनंत भारसाकळे, माधुरी मुंढे मॅडम, प्रफुल काळे सर , बंडू लोहारे सर , प्राजक्ता खांडेकर मॅडम, सुजाता गेडाम मॅडम , संगीता ढबाले मॅडम , योगेंद्र निमजे, प्रियंका बांते, स्वाती मानापुरे, सुरेश भोयर, संजय वाघमारे, प्रवीण जाधव सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनस्वी अभिनंदन शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष, तथा मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.





