Breaking
कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

बहरणार मी संग्राम कुमठेकर ता.अहमदपूर जि.लातूर

0 4 8 2 9 4

बहरणार मी…!

थोपवून दुःख लाटांना आता बहरणार मी
संकटातून वाट काढून ध्येय ते गाठणार मी
नाही तमा हारण्याची जिंकण्या लढणार मी
शक्ती सारी एकवटून अनिष्टता गाढणार मी

खुळचट नि पुळचट विचारांना सोडणार मी
मनुवादी रे बंद कवाडे शब्दगदेनं तोडणार मी
ढोंगी,लबाड धर्मांधांनाच धारेवर धरणार मी
चक्र तेच परिवर्तनाचे रे गतिमान करणार मी

लोकशाहीच्या रक्षणार्थ मैदानी उतरणार मी
लढणाऱ्यांच्या वाटेवर फुले तरी अंथरणार मी
रडगाणे बंद करण्या शब्दपेरणी करणार मी
शब्दास्त्र डागून उरात धडकी भरविणार मी

फुले शाहू आंबेडकर विचारांचा अनुयायी मी
वास्तव मांडून गाढेन कल्पनांना अनाठायी मी
जिजाई,रमाई,सावित्री नि मुक्ता शोधतोय मी
द्वेष मत्सर सोडून प्रेमळ माणसं जोडतोय मी

द्वेष मत्सर सोडून प्रेमळ माणसं जोडतोय मी

संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे