Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरनागपूरमराठवाडासाहित्यगंध

‘आभारीय शब्दसुमने’

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 1 9 8 7 4

‘आभारीय शब्दसुमने’

अल्लड अवखळ बाल्य
कागदी नावेत बागडते
मात्र भवसागर पार करण्या
समर्थ गुरूची साथ लागते

मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहूल दादांनी काल ‘कागदी नाव’ हा विषय काव्यरचनेसाठी दिला. आणि मन आपसूकच बालपणातल्या पावसाळ्यात न्हावून आले. मित्रासोबत केलेल्या कागदी होड्या वाहत्या धारेत सोडताना आणि त्या दिसेनाशा होईपर्यंत पाहताना एक वेगळाच आनंद मिळायचा. शाळेच्या मैदानावर तर हा खेळ हमखास रंगायचा. कधी कधी ही कागदी नाव पाण्यातच विरघळून जायची. हाच आशय इतरांचा पण येऊ शकतो हे गृहीत धरून मी वेगळा आशय मांडला आणि तो परिक्षकांना भावला.

शेवटी मानवी जन्म जीवन सुद्धा एक कागदी नावच आहे. जिचे अस्तित्व क्षणभंगुर आहे. जीवनरूपी भवसागरात ती सतत हेलकावे खात असते. असंख्य मोह प्रलोभनामागे भरकटत राहते. आणि मुक्तीचा महामार्ग दुर्लक्षित होतो. अशा वेळी समर्थ गुरूचा माथ्यावर हात आणि कुशल सारथ्याची ज्ञानसाथ वेळीच लाभली तर मात्र हीच नाव सुखरूपपणे किनार्‍याला लागते. जीवनाचे सार्थक होते. मानवी जन्माचा कार्यकारणभाव खोलात जाऊन जाणून घेतल्यास, त्याच्या सार्थकतेचा ध्यास आणि आस लागल्याशिवाय रहात नाही. मात्र यासाठी गुरूमार्गाशिवाय तरणोपाय नाही. हे ज्याला कळले त्याचे जहाज तरले… शेवटी अंतीम साध्य लक्षात आले तरच सार्थकतेची साधना करता येऊ शकते… असो

काव्यरचना सर्वोत्कृष्ट पोष्टरवर झळकणे हा एक विशेष सन्मान असतो. काव्यकलेच्या सार्थकतेचे समाधान तर असतेच. मात्र दर्जा सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा येते.. जी अधिक प्रेरणादायी असते. म्हणूनच या समूहाचा सदस्य असल्याचा सार्थ अभिमान वाटतो.
….. मुख्य प्रशासक आदरणीय राहूल दादा, आ. पल्लवीताईजी, आ. सविताताईजी, आ. वैशालीताईसाहेब, आ. स्वातीताईंजी, आ. वृंदाताईजी, आ. संग्राम दादा, आ. लांडगे दादा, आ. उरकुडे सर जी, आ. तारकाताईजी, आ. शर्मिलाताईजी या समस्त प्रशासक, परिक्षक, सहप्रशासक मंडळींचे मनःपूर्वक धन्यवाद.. तसेच माझ्यावर अभिनंदनीय शुभेच्छांचा वर्षाव करून मला प्रोत्साहित केल्याबद्दल सर्व समूह सहकारी बंधू भगिनींचेही अंतःकरणपूर्वक खूप खूप आभार

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 9 8 7 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे