Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूर

नागपूर ते शेगाव सायकल वारी उत्साहात संपन्न

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 1 7 5 8

नागपूर ते शेगाव सायकल वारी उत्साहात संपन्न

महिला सशक्तीकरण, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ व पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

नागपूर : (दि १८) द रॉक रायडर्स असोसिएशन नागपूर च्यावतीने आयोजित करण्यात आलेली नागपूर ते शेगाव सायकल वारी 14 ते 16 मार्च दरम्यान मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या पार पडली. समाजात महिला सशक्तीकरण, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या वारीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला विविध मान्यवरांनी शुभेच्छा देत सायकलस्वारांचा उत्साह वाढविला. वारी दरम्यान सहभागी सायकलस्वारांनी शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहात प्रवास पूर्ण केला. या वारीत एकात्मता, फिटनेस आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. वारीच्या पहिल्या दिवशी अमरावती येथे शासकीय वसतिगृहात सायकलस्वारांनी विश्रांती घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने शेगावकडे प्रस्थान करण्यात आले. सुमारे सायंकाळी ७ वाजता सर्व सायकलस्वार शेगाव येथे पोहोचले. तेथे श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन सर्वांनी आध्यात्मिक समाधान अनुभवले व विश्रांती घेतली. पुढील दिवशी परतीचा प्रवास सुरक्षितपणे पूर्ण करण्यात आला. ही वारी केवळ प्रवास न राहता सामाजिक संदेश देणारा आणि प्रेरणादायी उपक्रम ठरला. सहभागींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान हीच या वारीची खरी यशोगाथा ठरली.

वारीमध्ये सहभागी सायकलस्वार :
साधनाताई पापडकर, संजय धरमठोक, सुनिल दिकोंडवार, योगिता बरडे, संजय घुगल, प्रिती जाधव, अमोल ढोबळे, दिलीप वरकड, दिलीप बिरे, सारंग पन्डे, डॉ. सुषमा खंडागळे, जयंत मेंढी, भावना, आशिष पटले, मनोज जाधव, योगेश पापडकर, विष्णू शेंडे, यश गुगल यांची उपास्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 5 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे