Breaking
ई-पेपरनागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

श्रावणधारा

वृंदा(चित्रा)करमरकर

0 4 8 2 9 3

श्रावणधारा

श्रावण धारा अलबेली
वेड लावूनिया गेली
दिठी फुलूनिया आली
उमले एक एक पाकळी

लावण्याची तू गं खाण
नाही तुला जगाचे भान
पदी पैंजण झाले बेभान
खग विसरले गं तान

नादमयी तू पावन सरिता
कुंतल पाठीवरी रुळता
लडी मोत्यांच्या ओघळता
खळीदार हास्य फुलता

चमकते हे चांदण गोंदण
साज पाचूचे लाजे दर्पण
मोहमयी गे तुझे नर्तन
अवघी धरा दिली आंदण

शोभते ही सुवर्ण कांती
जशी गं वीज तळपती
आत्ममग्न तू सळसळती
उन्हे कोवळी तुला स्पर्शती

वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे