0
4
8
2
9
7
चुके काळजाचा ठोका
चुके काळजाचा ठोका
तुझ्या भेटीचा येईल मोका
हातात हात घालून फिरायचं
कोणी चोरून पाहिल धोका
भेटीची वेड लागले तुझ्या
बागेत भेटायला येशीलका
तुझ्याकडे आकर्षित झालो मी
जागेत सुद्धा तुझेच भास का
दूर गावी जाऊ नकोस तू आता
नाहीतर चुकेल काळजाचा ठोका
जीव जळतो तुझा माझ्यावरी
नाहीस ना देणार तू मला धोका
तुझ्या प्रेमाने वेडा पिसा झालो
मिठीत मी धुंद झालो
हृदयाचे ठोके धडधड लागले
तुझ्या येण्याने जीवन बहरलो
तुझ्या डोळ्यात ठाव लागला
कामाचा ताण येता थकवा पांगला
आनंदाने बहरले जीवन
उगीच जीव घालमेल झाला
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
========
0
4
8
2
9
7



