
0
5
9
7
0
2
रक्तपात नको मानवा
समजून घे बोल मनीचे
नकोस तापू सदानकदा
शांती समृद्धीचा मार्ग एक
समजून सांगावे तव कितीदा
ही वसुंधरा ही आसूसलेली
प्रितीच्या दोन शब्दासाठी
का रे राख डोक्यात भरूनी
धावतो असत्य मार्गापाठी
अन्न वस्त्र योग्य निवारा
गरजा मानवी हक्काच्या
शिक्षण दूध वाघिणीचे
हक्क प्रत्येका प्राशन्याचा
जाती धर्म अन् द्वेषापोटी
नको होऊ मुर्ख दानवा
इथेच जगणे इथेच मरणे
रक्तपात हा नको मानवा
ही हवा वाहते सर्वासाठी
ही भेद कधी का करते कुठे
सुर्य प्रकाशतो सर्वांसाठी
ऊन सावलीचा खेळ उठे
ही वाट भरभरून समृद्धीची
यशोशिखरावर पार नेते
हात देते मदतीचा नेहमी
जेव्हा विनम्रता अंगी येते
सविता धमगाये
ता. जि.नागपूर
======
0
5
9
7
0
2



