
0
4
8
2
8
4
माझी आजी
आईपेक्षा मऊ सावली,
मायेची अनंत शिदोरी,
माझ्या आयुष्याच्या वाटेवर
उभी होती एक आधारमूर्ती…
ती म्हणजे माझी आजी —
मैनाबाई गंगाप्पा होळकुंदे.
तिच्या कुशीत विसरायचो
जगातलं सगळं दु:ख-दारिद्र्य,
तिच्या ओढीच्या पदरात
सुरक्षित वाटायचं माझं बालपण.
लाड तिचे शब्दांत नव्हते,
ते तिच्या नजरेतून झरत,
एक भाकरी, एक घास,
आणि हजारो आशीर्वाद देत.
“तू मोठा होशील,”
हे सांगताना तिचा आवाज थरथरायचा,
पण तिच्या विश्वासानेच
माझं आयुष्य आकार घ्यायचं.
आज मागे वळून पाहताना
मन हळूच मान झुकवतं
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
जिल्हा धाराशिव
========
0
4
8
2
8
4



