
0
4
0
9
0
3
स्वयंसिद्ध
कर्मसिद्धांत हेचि तत्व
इतके बनावे स्वयंसिद्ध
आणि हाच स्वभावधर्म
आजन्म रहावे कटिबद्ध.. //
शस्त्र असेल तर कापावे
आग असेल तर जाळावे
विष असेल तर बाधावे
वचन असेल तर पाळावे .. //
जसे बोलावे तसे वर्तावे
काळ्या दगडावरची रेघ
सत्य नित्य असे बरसावे
वर्षाऋतुतले अमोघ मेघ..//
कर्णासारखे उदार दानी
रामासारखे एक बाणी
संतासारखी सत्य वाणी
जसे गंगेचे निर्मळ पाणी.. //
ना भूतो ना भविष्यातही
आदर्शाचा असा मापदंड
गाजत राहो कालातीतही
तेजस्वी शौर्याचा कालखंड.. //
विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
====
0
4
0
9
0
3





