
0
5
9
6
9
7
अहंकाराचा आरसा
अहंकाराचा आरसा
चेहरे दाखवितो खरे
स्वतःभोवती फिरणारे
विसरतात जग सारे…!!
पद मिळताच माणूस
आभाळाला भिडतो
पायाखाली माती आहे
हेच विसरून जातो…!!
पैशाचा तो गर्व मिरवतो
सर्व नात्यांनाही तोडतो
काळ फिरता क्षणामध्ये
एकटाच मग तो पडतो…!!
अल्प ज्ञान मिळाल्याने
विद्वान होईल का कुणी
विनम्रतेच्या गंधावाचूनी
कसा असेल खरा ज्ञानी..!!
नतमस्तक या जगण्यापुढे
एवढेच भान ठेवूया चला
अहंकाराचा आरसा फोडून
जपूया सारे माणुसकीला..!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जि.बीड
0
5
9
6
9
7



