0
4
8
2
9
4
हक्काची माया
हक्काची माया
कशी ही आटली
निर्दयी कृत्याने
जमीन फाटली
पोटच्या गोळ्याचा
केला तीने अंत
वाटली न तिला
कुठलीही खंत
नको ती अवस्था
आईची पाहिली
तीच ठरली त्याच्या
जीवाची काहिली
प्रियकराचा तिला होता साथ
भयाण होती काळरात
मायेनेच ममतेचा
केला होता घात
विषयुक्त दुध
प्याले निरागस ते बाळ
ममतेच्या रुपाने
पुढ्यात होता काळ
डॉ.सौ.मंजूषा साखरकर
ता.ब्रह्मपुरी,जि.चंद्रपूर
========
0
4
8
2
9
4



