
0
5
1
7
9
5
नितीमत्ता
डोळे असताना ,द्रुष्टीहीन झाले।
शोषित वंचित लोक क्षीण झाले।
तडा गेली भिंत,संसार भंगले।
घरे बांधणारे,उदासीन झाले।
नवीन युगाची,नवीन माणसे।
जुनाट चेहरे , नमकीन झाले।
रंगाची जगती,उधळण होते।
बेरंगी माणसे , रंगीन झाले।
श्रद्धा निष्ठा नाही,मन खेटरात ।
ईश्वर चरणी , तरी लीन झाले।
नितीमत्ता गेली ,दुराचार दंगे।
व्याभिचार मुळे,मलीन झाले।
एक सातबारा,जरी अवणीला।
भारत युरोप ,पाक चीन झाले।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा.जि,यवतमाळ
0
5
1
7
9
5



