Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: शनिवार दि. ८ मार्च २०२५ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या सुनियोजनातून व मार्गदर्शनातून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

दुपार सत्रात सर्व प्रथम उपस्थित मान्यवर महिलांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विशाल पाटील सर व यतिश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. त्यानंतर ग्रुप – ग्रामपंचायत आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे व उपस्थित सर्वांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

मुख्याध्यापक प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून महिला दिन व नारीशक्ती विषयी माहिती सांगितली. विद्यालयाच्या वतीने ग्रुप – ग्रामपंचायत आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, सदस्या सुहासिनी राणे, सोनाली माने, संचिता राऊळ, अवंती राणे, दिव्या म्हात्रे, साजिरी भगत, दिपाली मोहिते, माजी सदस्या ज्योती पवार, आवास गावच्या पोलीस पाटील श्रेया म्हात्रे, डॉक्टर राजश्री पाटील, डॉक्टर प्राजक्ता मसुरकर, त्यांच्या सासूबाई कांचन मसुरकर, संस्थेचे खजिनदार सुवर्ण कांबळी यांच्या पत्नी स्मिता कांबळी या सर्व मान्यवर महिलांचे औक्षण करण्यात आले तसेच गुलाबपुष्प, शाल व सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.

यानंतर विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका पल्लवी पाटील मॅडम, दिव्या भगत मॅडम, प्रिती कवळे मॅडम, प्रियंका राणे मॅडम, शतदा म्हात्रे मॅडम व शिक्षकेत्तर कर्मचारी मधुमती गायकर यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी रक्षिता मात्रे [ इ. ८ वी अ ] व पायल म्हात्रे [ इ. ९ वी अ ] या विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर दिव्या भगत मॅडम व आशिष राणे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर डॉक्टर प्राजक्ता मसुरकर, डॉक्टर राजश्री पाटील, ग्रामपंचायत सदस्या संचिता राऊळ, सोनाली माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर सरपंच अभिलाषा अभिजीत राणे यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना मार्गदर्शन केले व केलेल्या सन्मानाबद्दल विद्यालयाचे आभार मानले.
यानंतर इयत्ता १२ वी कॉमर्सच्या विद्यार्थीनींनी काकस्पर्श चित्रपटातील जन्म बाईचा बाईचा, खूप घाईचा या गाण्यावर अप्रतिम असे समूहनृत्य सादर केले.

या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी अतिशय सुंदर असे फलक लेखन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पल्लवी पाटील मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन प्रिती कवळे मॅडम यांनी केले.
सकाळ सत्रात महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये सई म्हात्रे [ इ. ११ वी कॉमर्स ], वेदांगी दरीडगे
[ इ. ११ वी कॉमर्स ], सिद्धेश राणे [ ११ वी आर्ट्स ] या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नितिन शिंदे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन धनराज फड सर यांनी तर सूत्रसंचलन दत्तात्रय अहिरे सर यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे