Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरमहाराष्ट्रमुंबई

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन च्या वतीने बैलगाडी शर्यतीची छायाचित्र स्पर्धा सपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 3 0 0

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन च्या वतीने बैलगाडी शर्यतीची छायाचित्र स्पर्धा सपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलीबाग: रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओ ग्राफर्स असोसिएशन शी सलग्न असलेल्या अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन च्या वतीने बैलगाडी शर्यतिची छायाचित्र स्पर्धा सपन्न. गुढीपाडव्याला डॉ. सचिन राऊळ आणि राकेश राणे यांनी नागाव येथिल सातताड बंदरात बैलगाडी शर्यत आयोजित केली होती, या शर्यतीची छायाचित्र स्पर्धा अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन च्या वतीने ठेवली होती.

सदर स्पर्धेचा निकाल नुकताच चेंढरे ग्रामपंचायतच्या सभागृहात सपन्न झाला.
स्पर्धेत तब्बल 48 छायाचित्रकार सहभागी झाले होते. या स्पर्धेचे परीक्षण ‘सानपाडा’ नवी मुंबई येथिल प्रसिद्ध छायाचित्रकार महेंद्र भाईंदरकर यांनी केले.
त्यांनी केलेल्या परीक्षणनुसार उदय पाटील यांनी प्रथम क्रमांक, वैभव शिंदे द्वितीय, चैतन्य वाडेकर तृतीय तर अनिरुद्ध वर्तक यांनी उत्तेजनार्थ परतोषिक पटकवला.
विजेत्या स्पर्धकांना स्पर्धेचे बक्षीस प्रयोजक, संदीप गायकवाड, स्पर्धेचे परीक्षक महेंद्र भाईंदरकर, रायगड फोटग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष समीर भायदे, उपाध्यक्ष समीर मालोदे, सचिव आनंद निंबरे, खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष तुषार थळे यांच्या हस्ते रोख रक्कम रुपये 5000, 3000, 2000 आणि 1000 व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन चे उपाध्यक्ष राकेश दर्पे, सचिव विकास पाटील, सहसचिव अमोल नाईक, खजिनदार विवेक पाटील, सहखजिनदार प्रणेश पाटील, सुबोध घरत, अमर मढवी, सुदेश माळी, निलेश दुदम, जितू शिगवण सचिन आसरानी अतुल वर्तक यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे