0
4
8
2
9
7
वाचू आनंदे
जीवनाचे क्षण अनमोल,
मस्तीभरे जगूया स्वानंंदे…
नाचू गाऊ हासू आणिक ही,
जगण्यालाही वाचू आनंदे..१
येतील कैक जातील कैक,
जीवनी संकटावर संकटे…
भिक घालायची मुळी नाही,
पुढे ठाकले जरी भामटे…२
मनगटाची शक्ती तयांना,
होऊनिया दावा शिरजोर…
आनंदाच्या उत्सवाचा शोर,
मांडा सर्वस्तरी पुरजोर…३
वाचनाच्या व्यासंगात मिळे,
जगण्याचा भारी मूलमंत्र…
‘सुधाकरा’ वाचन छंदात,
दडलेत अति गुढ तंत्र…४
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर नागपूर
========
0
4
8
2
9
7



