लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासचा उपक्रम
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: शुक्रवार दि. १ अॉगस्ट २०२५ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.
सकाळ सत्रात इ.११ वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच दुपार सत्रात इ.५ वी ते इ.१० वी च्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. दोन्ही सत्रात सर्व प्रथम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
दुपार सत्रात मुख्याध्यापक – प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी तर सकाळ सत्रात दत्तात्रेय अहिरे सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची महती सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सकाळ सत्रात कैलास शिकारे सर व नितिन शिंदे सर यांनी तर दुपार सत्रात आशिष राणे सर व दिव्या भगत मॕडम यांनी आपल्या मनोगतातून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची महती सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सकाळ सत्रात धनराज फड सर यांनी तर दुपार सत्रात सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. सकाळ सत्रात प्रियंका राणे मॕडम यांनी तर दुपार सत्रात सुनिल मोरे सर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
दोन्ही सत्रात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला व अतिशय सुंदर भाषणे करून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची महती सांगून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. दोन्ही सत्रातील उत्कृष्ट भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी सचिन भंडारे सर व सर्व शिक्षक – शिक्षिका यांनी कौतुक केले.



