
0
5
1
7
9
5
होळी
होळी रे होळी
पुरणाची पोळी
जंगलातून आणू या
लाकडाची मोळी
वाळलेली लाकडे
करा गोळा
चला चला
पळा पळा
झाड तोडू नका
गोवऱ्या थापू नका
रंग लावू नका
पाणी वाया घालवू नका
सकाळी उठू
आंघोळ करू
आई-बाबांना
नमन करू
आईने स्वयंपाक
केला छान
ताईने केले
जेवणाचे पान
वरण -भात भाजी पोळी
होळी रे होळी
पुरणाची पोळी
भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता. उमरेड जि. नागपूर
======
0
5
1
7
9
5



