ई-पेपरकवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध
तुझ्या प्रेमाची सावली
कुसुम पाटील कसबा बावडा, कोल्हापूर

0
5
4
7
7
9
तुझ्या प्रेमाची सावली
तुझ्या प्रेमाची सावली
माय,ममता,अन् स्नेहाची
भीती न वाटते कशाची
होती सावली तुझ्या प्रेमाची
मनाच्या वाटेवर उमटली
उन्हात थंडावा मिळाला
सहवासात खुलले जीवन
नात्याच्या धाग्यात गुंफला
सावली जशी वृक्षाची छाया
थकलेल्या शरीराला मिळाली
रंगांमध्ये राजसा रंगली
मनाला भावनेची ओढ वाढली
तुझ्या प्रेमाच्या सावलीत
दिले सर्वकाही अगणित
जीवनात आधार वाटला
लाभले आम्हास आयुष्यात
सहवासात सतत राहून
वेचले मी सुखाचे क्षण
जीवन झाले सार्थक
करतो मी तुला औक्षण
कुसुम पाटील
कसबा बावडा, कोल्हापूर
0
5
4
7
7
9



