कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध
गुरुपौर्णिमा; कुसुम पाटील
0
4
8
2
9
7
गुरुपौर्णिमा
ज्ञानाची माऊली शक्तीची सावली
दैवत गुरु ज्ञानाचा महासागर
गुरुपौर्णिमा ज्ञानाची शिदोरी
सुसंस्कृती जीवनाचा आधार
विद्येचा माहेरघर गुरु शिष्याचं
गुरु म्हणजे अज्ञानाचा नाश
आषाढ शुद्ध पौर्णिमेला
व्यास पौर्णिमेचा दिवस खास
त्यागसमर्पण कर्तव्य निष्ठा विश्वास
हिच गुरुची खरी शिकवण
ज्ञानसागरातील ज्ञानदेवता
शिक्षक दुसरे गुरु करितो वंदन
विद्या रुपी चंदनातील महाज्ञानी
शिकविले त्यांनी उमलली फुले
आशीर्वादाचे ज्ञानाचे भांडार
नेतृत्वही दिसे हृदयी प्रेमळले
प्रेरणास्थान असे हा गुरू
जीवनात असे आधार
अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेही
गुरूंच्या शब्दांचा आदर
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
0
4
8
2
9
7



