0
4
8
2
9
4
मोहोर
आला आंब्याला मोहोर
लक्ष सर्वांचे वेधतो
आमराई भोवताली
गोड सुवास दाटतो.
हळदीने नटलेला
अंगोपांगी बहरला
येता वाऱ्याची झुळूक
गंध दिशात भिनला.
रंग पिवळा पाहून
पक्षी आनंदून जाती
उडया फांदीवर घेती
सुस्वरात गीत गाती.
रानातली माकडेही
इकडेच धाव घेई
उडी फांदीवर जाई
सारे अस्ताव्यस्त होई.
येता मर्कटांच्या हाती
दमछाक होई फार
असा नाजुक फुलोरा
पडलाय थंडगार.
दीपककुमार सरदार
ता. लोणार जिल्हा बुलढाणा
==========
0
4
8
2
9
4



