पुणे विद्यार्थीगृह शाळेत दुमदुमला चिमुकल्यांचा आवाज; ‘गणपती बाप्पा मोरया’
वसुधा नाईक, पुणे
पुणे विद्यार्थी गृह शाळेत दुमदुमला चिमुकल्यांचा आवाज; ‘गणपती बाप्पा मोरया’
वसुधा नाईक, पुणे
पुणे : (दि.9 सप्टेंबर) डाॅ.मधुसूदन घाणेकर ब्रम्हध्यान विश्वपीठ संस्थेतर्फे दरवर्षी खास चिमुकल्यांसाठी ‘ गणपती बाप्पा मोरया ‘ हे काव्यसंमेलन घेतले जाते.याही वर्षी विश्वपीठाचे संस्थापक अध्यक्ष आणि पहिल्या विश्वकाव्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच ‘ गणपती बाप्पा मोरया ‘ हे काव्य संमेलन घेण्यात आले.
पुणे विद्यार्थी गृह, शिशु निकेतनच्या मुख्याध्यापिका अरुणा कांबळे आणि भारतीय विचारधारा संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टी-ज्येष्ठ नागरिक आघाडी-महिला आघाडीच्या शहर कार्याध्यक्ष भारती महाडिक या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
वसुधा इंटरनॅशनलच्या अध्यक्षा, कवयित्री वसुधा नाईक, तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा प्रिया दामले आणि डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी बालांसमोर गणपती बाप्पाच्या कविता सादर केल्या.या कवितांना , उपस्थित 200 चिमुकल्यांनी ‘ गणपती बाप्पा मोरया ‘ या जयघोषांनी उत्स्फूर्त दाद दिली.
भारती महाडिक यांनी खाऊवाटप केले. गोड बोलणा-या 6 बालकांधा डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी ‘ मिठू मिठू पोपट ‘ पुरस्काराने सन्मानित केले. ईश्वरी निलेश पवळे , आरोही उमेश लोहकरे , क्षितिजा सुधीर नेवसे , स्वामीराज गणेश तापकीर, खरेश सुनिल जगदाळे आणि जयेश जालिंदर धायतडक या गोड चिमुकल्यांना डाॅ.घाणेकर यांनी जाहिररित्या सन्मानित केले.
डाॅ.मधुसूदन घाणेकर ‘गणपती बाप्पा मोरया ‘ हा काव्यसंमेलनाचा उपक्रम गेली 16 वर्ष निरपेक्षपणे राबवत आहेत.वसुधा नाईक यांनी आभार मानले.कार्यक्रमानंतर डाॅ.घाणेकर यांच्या शुभहस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली.



