आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनविदर्भसाहित्यगंध
उडदाच्या दाण्याची आमटी
मीनाक्षी काटकर दारव्हा यवतमाळ

0
4
0
9
0
3
माझी पाककला
उडदाच्या दाण्याची आमटी
साहित्य: एक वाटी ओले उडदाचे दाणे, पाच ते सहा भाजलेल्या हिरव्या मिरच्या व लसूण पेस्ट, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, धने जिरेपूड, हळद, मीठ, एक मोठा चमचा तेल, कढीलिंब पाने पाच ते सहा, मोहरी, गरम पाणी तीन वाट्या इत्यादी.
कृती: दाणे कढईत भाजून मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्या. कढईत तेल घाला. मोहरी तडतडली की त्यात मिरची लसूण पेस्ट, कढीलिंब पाने घाला व चांगले परतवा. नंतर त्यात हळद,धनजिरे पूड व दाण्याचे वाटण घालून मीठ व पाणी घालून मंद आचेवर शिजू द्या.आमटी चांगली उकळी आल्यावर कोथिंबीर घाला.बाजरीच्या भाकरीसोबत खायला द्या. गरमागरम उडदाच्या दाण्याची आमटी.
वाढप:- ही आमटी दोन ते तीन जणांना पुरेल.
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
0
4
0
9
0
3





