0
4
8
2
9
0
अंतिम पाकळी मी
सुखाची अंतिम पाकळी मी
देऊन सारे आज मोकळी मी
रिक्त हात अन् शब्द तोकडे
सांगू कशी आज विपदा मी…
बालपण गेले कसे काय सांगू
मुलगी म्हणून जन्मले इथे चुकले मी
प्रत्येक वात्सल्य क्षणास
साश्रू नयनांनी हसत मुकले मी….
बहरलेले तारूण्य बहरले
हजारो नजरांचे घाव सोसले मी
जपत जपत स्वतः ला
यशाचे शिखर गाठले मी….
कोंडून ह्दयास बंद कवाडी
दुसऱ्या जन्मात प्रवेशले मी
नव्हती गरज जिथे मुळीच माझी
तिथेही नंदनवन फुलवले मी…..
बळेच लावून जीव सगळ्यां
मम जीवन ओवाळले मी
कुठे राहिल जीव कसा
प्रत्येक क्षण तळमळले मी…..
तरीही हार नच मानली
पुन्हा स्वप्न गोजिरे रंगवले मी
स्वार्थी या दुनियेत
पुन्हा कितीदा भरडले मी…..
शर्मिला देशमुख -घुमरे
ता.केज जि.बीड
0
4
8
2
9
0



