0
4
8
2
8
6
ऊन पाऊस
ऊन पाऊस खेळ बालपणीचा
खेळण्यात सारे दंग झाले,
खेळू सारे आनंदाने आम्ही
नका करू चेहरे हिरमुसले.
ऊन म्हणजे दुःख असते
सावली म्हणजे सुख असते,
बालबोध मनाला तेव्हा वाटले
पण प्रत्येक्षात हीं तसेच दिसते.
धडपड होती, खेळा तली
मरमर होती सावली ची,
होणार नाहीत झळा सहन
धग नको मला उन्हाची.
जेव्हा आयुष्य जगत गेलो
आठवला बालपनीचा खेळ,
कुटुंबाच्या सुखाचा सांगा
कसा कसा घालू मेळ.
आधुनिक यां, जीवन पद्धतीने
धावपळ, वाढविली प्रत्येकाची,
कळेना काही?काय कशी?
तयारी करावी, कार्य नियोजनाची.
मायादेवी गायकवाड
मानवत,परभणी
========
0
4
8
2
8
6



