Breaking
ई-पेपरकविताचंद्रपूरनागपूरविदर्भसाहित्यगंध

गुज मनाचे

प्रा.दिनकर झाडे

0 4 8 2 9 0

गुज मनाचे

जपले अजुनी हृदयकुपीत
असह्य दुःख अन् कष्ट तनाचे
व्यक्त न केल्या आर्त भावना
परि सांगू कुणाला गुज मनाचे

आब राखण्या आईबाबांची
ठेविले मनी भय जनाचे
प्रीत अबोल तशीच राहिली
परि खोलले ना गुज मनाचे

तुलाच भेटण्या अतृप्त नजरा
निमित्त बघते अजुनी सणाचे
खोट्या प्रतिष्ठेचे अंगी वलय
सांगू कुणाला मी गुज मनाचे

येता कधी नजरे समोर
मनी उठती हर्ष लहरी
कवेत घट्ट घेऊन तुजला
व्यक्त करावी प्रितबावरी

समाजास हे मान्य नसे रे
सोशीते,असह्य घाव घणाचे
बंध प्रितीचे घट्ट असुनी
सांगू न शकले गुज मनाचे

स्वप्नं साकार ना या जन्मात
पुढल्या तरी होईल का रे?
गुज मनाचे कळता तुजला
पूर्ण करशील का मनोरथ रे ?

प्रा.दिनकर झाडे
गडचांदूर, जि.चंद्रपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे