बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट अकरा🎗🎗🎗*
*🥀विषय : आत्मबंधन🥀*
*🍂बुधवार : २६/ मार्च /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*आत्मबंधन*
माझे तुझ्यात गुंतणे…
एक न उलगडणारे कोडे…
कसे गुंफावे तरी जन्म…
तुलाही उमगावे ना थोडे… //
माझे असे झुरणे मरणे
तुला श्वासमोलाने स्मरणे
जाणवलीच नाहीत का
तुला माझी ह्रदयस्पंदने… //
कळलेच नाही कधी कसा
माझा प्रवेश झाला तुझ्यात
ही सोडवू कशी गुंतागुंत
मी उरलोच नाही माझ्यात… //
कळून चुकले माझे मला
हा सारा एकतर्फी खेळ
साधणार नाही कधीच
तुझा आणि माझा मेळ… //
आत्मसंयम समज किंवा
हा समज आत्मसाक्षात्कार
आत्मबंधन घालून स्वतःवर
केला भावनांचा स्वाहाकार.. //
हा असा सारा दस्तऐवज
कोरला गेला काळजावर
आता माझ्यासह शांतपणे
तो जळून जाईल सरणावर… //
कधी त्याच स्मशान वाटेने
जर झाले तुझे आगमन तर
तुझ्या नावाच्या प्रतिध्वनीचा
बघ ऐकू येईल तुला मंद स्वर… //
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💕🩷➿➿➿➿
*आत्मबंधन*
संपले वाटले सारे जेव्हा
तू घेतलास हात हाती
आपुलकीच्या शब्दाने
भरलीस ओंजळ रिती
वाळवंटी जीवन होते
चहुदिशेस दिसे नैराश्य
तू पेरलेस ओठावरती
सुमधुरसा एक हास्य
तुझे येणे मम जीवनी
वसंताचा आहेर झाले
ग्रीष्माच्या दग्धतेतील
गुलमोहराचे बहर झाले
कळत- नकळत गुंतले
कसे तुझ्यात हे मन?
भाव परी निर्मळ माझा
नव्हे मी कामदेवाची सुमन
तुझा माझा मार्ग वेगळा
जाणून आहे मी हे सत्य
तरीही हृदयात माझ्या
तुझाच वास असेल नित्य
राधा समान जपेन मी
आत्मबंधन अपुले जन्मभरी
तुझ्याच आठवात जगेन मी
ही शपथ माझी आहे करारी
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💕🩷➿➿➿➿
*आत्मबंधन*
जनकल्याणी झिजावे, होऊनी चंदन।
माणसा तु जपावे, स्वतः आत्मबंधन।।
नकोणा हिनवावे, नकोणा जळवावे।
सुख दुःखात धावावे,द्यावया स्पंदन।।
क्षणिक जीवनाला, जाणून घेऊ आता।
निसर्ग देई धडे, करावया चिंतन।।
निर्वान मोक्ष काय, कळले कुणा नाही।
जगावया आयुष्य, मनी करा मंथन।।
नाते जपावयाला, सक्षम होवू आता।
माणूसकीचे येथे, होऊ नये. हनन।।
आचार शुद्ध ठेवू, विचार शुद्ध ठेवू।।
संतवाणीस करू, रोज नित्य वंदन।।
उरात प्रेम राहो, प्रेमाने गीत गावो।
सारे मिळून जावो, हे नंदिनी नंदन।।
*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💕🩷➿➿➿➿
*आत्मबंधन*
गंभीर सागरा सख्या
तुला मनी मी जपते
तुझ्यात मिटण्याचे
स्वप्न डोळ्यांत पाहते
आत्मबंधन आपुले
सदैव मनी जाणते
जगणे रे तुझ्यासाठी
रुप तुझे मनी ध्याते
अगणित डोंगर वाटा
तुडविते कडेकपारी
तुज भेटण्याची असोशी
प्रीत नाद मनी झंकारी
तुला रे अनेक पूजती
पण मला तू एकला
सांद्र मनची सांगते
मी तुझीच रे चित्कला
समर्पणा आतुर अंतरी
एक हलका पुरे इशारा
आत्मीयता भेटण्याची
समर्पित मीच ती धारा
जन्म झाला धन्य सख्या
आत्मबंधनही जुळले
जन्मोजन्मी नाते असे
तुझ्याशी मी जोडले
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💕🩷➿➿➿➿
*आत्मबंधन*
आत्मबंधनातून होतो जेव्हा मुक्त
माणूस खऱ्याअर्थी होई सशक्त
अंधारात जेव्हा दिसे पायवाट
आयुष्यात येई सुखाची लाट
स्वर्ग-नर्क सारे वाटू लागे थिटे
तेव्हाच भक्तांसी भगवंत भेटे
मुखामधी घेता सदा हरीनाम
सायास होई कठिण ते काम
सदाचार, वर्तन उत्तम घडती
पंढरीच्या वाटे पाऊल पडती
दिसता हो मुख तुझे अंती देवा
वाटे मज मग संसाराचा हेवा
तुझ्या पायाशी सदा व्हावे लीन
मुखातून घडो नित्य तुझे गुणगाण
*रचना – इंदुरवार बी.आर*.
*किनवट जि.नांदेड*
*©*सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💕🩷➿➿➿➿
*आत्मबंधन*
बेधड़क वागणं तिचं
निखळ,मनसोक्त हसनं
सुंदरतेची मुर्ति जनू…
विलासित तिचे जीवन ।।
स्वप्न अंतरी बाळगुन
माप तीओलांडली
त्या धान्यासोबत अंतरीचे
भावही ओसंडली……।।
मानाचा पदर डोक्यावर
हसनं गालच्यागाली…..
मनाविरुद्ध वक्तव्यालाही
नाही म्हणनच विसरली ।।
सरकारी नोकरी सोडली
हिंडण्या फिरण्यास दुरावली
सासू सासरे काशी-तीर्थ
येवढचं मनी कुरवाळली ।।
आत्मबंधन तिचे हे
स्वतःचं तिने स्वतःस लावले
पारंपारिक सुखासाठी
आत्मबल वाढवले ।।
नशिब तिचं बलवत्तर
पुन्हा नोकरी लागली
तिच्या अंतरी गुणांची
ओळख समस्ता जाहली ।।
*सौ.कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💕🩷➿➿➿➿
*आत्मबंधन*
आत्मबंधन मज वाटे
स्वतःचा स्वतःशी अलवार बंध
परिस्थिती आणि मनस्थिती
यांना जोडणारा दुवा एकसंध
बंधन नसे हे लादलेले
परि उमजाया जातो वेळ
मन, बुद्ध विवेकाने साधतो
आपण आपल्या अस्तित्वाशी मेळ
क्षणभंगुर आयुष्याचे हे दान
पूर्वकर्माने ईश्वर देतो
आत्मबंधन संयमाचे अंगिकारता
भवसागर सुखाने पार होतो
जीवनाचा प्रत्येक क्षण तसा
एकट्यानेच जगायचा असतो
जाणिव याचि होता माणूस
स्वसंगतीत आनंदाने रमतो
*सौ. रजनी भागवत.*
*सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
*ऐरोली, ठाणे*
➿➿➿➿🩷💕🩷➿➿➿➿
*आत्मबंधन*
आयुष्याचा प्रत्येक दिवस
उगवत असतो नवा नवा
रात्र संपून कोवळी किरणाने
वाटे तो दिवस चैतंन्य नवा
वेळेचा आनंद घ्यायला
शिकावे आपल्या जिवनात
रोज उगवणारा दिवस नवा
येत असतो आपल्या आयुष्यात
वेळेचा ठेऊन भान
आत्म्याला देऊ नये ताण
शांतता अनुभवा पहाटेची
ती वेळच असतो शांततेची
प्रेम बंधनात राहून सदा
करावे थोडा आत्मचिंतन
मनाची स्थिती सुधारत असतो
योग्य जगण्यास आहे जिवन
आत्मक्लेश न वाढवता
आत्मविश्वास ठेवा स्वतःवर
आत्मनिर्भर होऊन स्वतः
सुख समृध्दीने जगा जिवनभर
आत्म्याला बंधनात न ठेवता
आत्मबंधन लादू नका
आत्मिक भावनेने देऊन स्वातंत्र्य
भार त्याच्यावर ठेऊ नका
आत्मा हे पवित्र विचाराचे
आहे एक माहेर घर
क्षणा क्षणाला दिसतात भाव
तेच अनुभवा जिवनभर
तेच अनभवा जिवनभर
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🩷💕🩷➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १६३ साठी आजच साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आत्मबंधन*
घालून द्यावेत स्वतःलाचं
नियम आचार विचाराचे,
पालन करावया तंतोतंत
स्वतः वर्तनातून जपायचे
वाईट विचारा तिलांजली
पेरणी व्हावी सुविचाराची
मनामधी खुणगाठ बांधून
जपणूक करा सद्गुणाची
आचरण शुद्ध ठेवून वर्तन
नसेल कुणाची शिकवण
आत्मबंधन घालून जपावे
साधावे जीवनाचे नियमन
जाणून घ्यावे स्वतःमधील
जे अंगभूत कलागुण आहे
जोपासना व्हावी त्याचीच
यशाचा साधक मार्ग आहे
नको राहू कुणाच्या अंकित
कुणाची शिरजोरी कशाला
धरण उशाला असून उगाच
कोरड पडाय नको घशाला
आत्मबंधन बाळगून राहता
कुणाची काय मजाल आहे
भवितव्य तुझे तुझ्या हाती
तूच तुझा उध्दारकर्ता आहे
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💕🩷➿➿➿➿
*आत्मबंधन*
जगावेगळे नाते आपुले
जणू पूर्वजन्मीच आत्मबंधन
युगायुगाच कोरलेले…
तुझ्या नावाचं काळजावर गोंदण
तुला पाहताच क्षणीचं
डोळे माझे पाणावतात
शब्दावीन तुला सख्या
भाव हृदयाचे कसे कळतात
तुझ्या केवळ आभासाने
मन होतं खूप भावुक
गुपित आपुल्या नात्याचं
तुला आहे का रे ठाऊक?
अंतर्मनी रुजलेलं
अनामिक नातं खोल खोल
दोन मनाला जोडणारी
ही कुठली अदृश्य डोर?
इतका कसा छंद तुझा
हे कोडं मला सुटेना
आत्मबंधन जन्मोजन्मीचे
साथ संगत तुटेना.
*सौ. इंदू मुडे, ब्रम्हपुरी, /चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💕🩷➿➿➿➿
*आत्मबंधन*
भडकी आगी ज्वाला
आतुन धुरं निघाला
पेटविले आत्मबंधन
जागले ना आत्मभान ||
रौद्र रूप धारोनी खचल
माणुसकीचे आत्मबल
आत्मसंधानाची राख झाली
पण कोणी ना विझवली ||
आत्मबंधनी होती आपुलकी
ऋणानुबंधनात जोडली होती
झाली सगळी माती झाली माती
कर्मठी ठिणगी दिवाळ काढती ||
का दिलीस अशी आहुती?
भयभित करून सोडी भिती
नव्हती अंतरीप्राणात प्रिती
चिता सरणी होरपळती ||
आत्मा जाळून तळतळाटला
टाहो फोडीते वाचवा जिवाला
कोळसा झाला कासया रडता
कळवली का नाही आत्मियता ||
*प.सु.किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💕🩷➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖





